पुणे मॅरेथॉनमध्ये इथोपियाचा डेफिसी विजेता

December 4, 2011 12:45 PM0 commentsViews: 20

04 डिसेंबर

पुण्यात आज 26वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. इथोपियाच्या डेफिसी रेगासा स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने 2 तास 16 मिनीट 56 सेकंदात स्पर्धा जिंकली. केनियाचा फिलेमन रोडिचला दुसरं तर इथोपियाच्या नेगास अबेबलो स्पर्धेत तिसरं स्थान मिळालं. याआधी मुख्य मॅरेथॉनला सकाळी सात वाजता सुरुवात झाली.

महिला आणि बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरूवात केली. यावेळी हौशी पुणेकरांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. विविध क्षेत्रातील व्यक्ती या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसल्या. स्रीभ्रुण हत्या रोखण्याचा संदेश या मॅरेथॉनमधून दिला गेला. मुख्य तसेच अर्धमॅरेथॉनमध्ये परदेशी धावपटूंसह पाचशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली होती. याशिवाय अपंग, प्रौढ अशा विविध गटात तीस हजारहून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदवलं. यात केनिया, इथिओपिया, श्रीलंका आणि भारतातील नामवंत खेळाडू होते.

close