देवनार येथे उतरवलं 33 टन कुजलेलं मांस

December 3, 2011 4:06 PM0 commentsViews: 11

03 डिसेंबर

मुंबईतील देवनार डंम्पिंग ग्राऊंड मध्ये 33 टन मांसाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. या जैविक कचर्‍यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परदेशातून हे सीलबंद मांस कंटेनर मधून नवी मुंबईमधील जे. एन. पी. टी. आले होते. मुलुंडच्या फॉर्चुन इंटरप्राझेजच्या नावाने हा कंटेनर भारतात आला. दरम्यान हे मांस कुजल्यामुळे या कंटेनरमधील मालाचे नवी मुंबईतील तुर्भे येथील डंम्पिग ग्राऊंड मध्ये नेण्यात आले होते.

सडलेला भाजीपाला असल्याचा सांगून तुर्भे येथ या मालाची विल्हेवाट लावण्याची परवानगी महानगर पालिका आयुक्तांकडून घेण्यात आली होती. पण परिसरातील पर्यावरणावदी संजय गुरव यांनी या कंटेनरमध्ये मांस असल्यामुळे याची विल्हेवाट लावण्याला विरोध केला. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त वानखडे यांना याची माहिती दिल्यानंतर हे कंटेनर पुन्हा जे.एन.पी. टी. मध्ये परत आलेल्या देशात पाठवण्यात आले.

आज सकाळी हा कंटेनर देवनारच्या डंम्पिंग ग्राऊंड मध्ये आणण्यात आला. मुलुंडच्या फॉर्चुन इंटरप्राझेजच्या नावाने कागदपत्रे बनवून हा कंटेनर मुंबईच्या हद्दीत आणण्यात आला. एका बुलडोझरच्या साहायाने हा संपूर्ण कंटेनरमधील माल देवनार डंम्पिंग ग्राऊंड मध्ये पुरण्यात आला.

आयबीएन लोकमतचे सवाल

- जेएनपीटी बंदरात आलेल्या या मालाची तपासणी का झाली नाही ?- 33 टन कचर्‍याच्या डंम्पिंगला परवानगी का देण्यात आली ?- देवनार डंम्पिंग ग्राउंडमध्ये कचर्‍याच्या डंपिंगची परवानगी कुणी दिली ?- नवी मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर मुंबईच्या हद्दीत हा कचरा का आणण्यात आला ?- असे प्रकार रोखण्यासाठी महापालिका काय कारवाई करणार ?

close