नालासोपार्‍यात गुंडांचा हैदोस ; वाहनांची तोडफोड

December 4, 2011 1:09 PM0 commentsViews: 5

04 डिसेंबर

मुंबई येथील नालासोपार्‍यातील आचोळे – डोंगरी परिसरात अज्ञात गुंडांनी 70 ते 80 गाड्यांची तोडफोड केलीय. यामध्ये रिक्षा टेंम्पो मोटारसायकली, जीप यांचा समावेश आहे. यावेळी एका घरात घुसून घराचे दरवाजे आणि खिडक्यांची तोडफोड करण्यात आलीय. मनसेच्या कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आलीय. यामध्ये एक तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. राजकीय वादातून ही तोडफोड झाली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. रात्री अडीच तीनच्या सुमारास हा प्रकार घडला असून जवळपास 250 लोकांच्या जमावाने ही तोडफोड केली असल्याचं पोलीस सांगत आहेत. पण कोणत्या कारणावरून ही तोडफोड झाली आहे याचं कारण अजून कळू शकलं नाही.

close