हेल्मेट वापरा सांगण्यासाठी भव्य वाहन रॅली

December 4, 2011 1:25 PM0 commentsViews: 6

04 डिसेंबर

हेल्मेटचा वापर न केल्याने अपघात घडण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यामुळेच हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी आज मुंबईतल्या काही तरुणांनी मोटरबाईक रॅली काढली. हाजी अली ते बँड स्टँड जनजागृतीसाठीची ही मोटरबाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत 150 महागड्या विदेश बाईकही सहभागी झाल्या होत्या. बाईक रायडर असलेले हे सर्व तरूण मागील 10 वर्षांपासून अशाप्रकराची रॅली काढत आहे. पोलिसांच्या हेल्मेट सक्तीला आपण सहकार्य द्यावं हा संदेश देत काढण्यात आलेल्या या रॅलीत मुंबईतल्या तरुणांबरोबरच गुजरातमधून आलेले तरुण सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

close