सुखना जमीन घोटाळ्याप्रकरणी अवधेश प्रकाश दोषी

December 3, 2011 4:24 PM0 commentsViews: 5

03 डिसेंबर

सुखना जमीन घोटाळ्याप्रकरणी लेफ्टनंट जनरल अवधेश प्रकाश दोषी आढळले आहे. लष्कराने त्यांना सेवेतून बडतर्फ केलं आहे. त्यांना आता पेन्शन किंवा इतर सुविधा मिळणार नाहीत. कोर्ट मार्शल झालेले ते सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. गुवाहाटीतल्या जनरल कोर्ट मार्शलकडून त्यांना दोषी धरण्यात आलंय. पश्चिम बंगालमधल्या सुखनातली लष्कराची जमीन बेकायदेशीरपणे एका बिल्डरला दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

सुखना जमीन घोटाळा घटनाक्रम

- 2008 – भूखंड विकत घेण्याबाबत लष्कराकडून प. बंगाल सरकारला पत्र – ऑक्टो. 2008 – ले. ज. पी. के. रथ यांनी बिल्डर दिलीप अग्रवालचं नाव ले. ज. प्रकाश यांना सुचवलं- मार्च 2010 – लष्कराकडून अग्रवालना भूखंडासाठी NOC – चीफ ऑफ स्टाफ रमेश हलगली यांनी घोटाळ्याबाबत आवाज उठवला- 2010 – ले. ज. प्रकाश आणि पी. के. रथ दोषी- फेब्रु. 2010 – माजी लष्करप्रमुख दीपक कपूरनी कोर्ट मार्शलचे आदेश दिले- जाने. 2011 – ले. ज. पी. के. रथ यांच्यावर कोर्ट मार्शलची कारवाई- रथ यांची 2 वर्षं ज्येष्ठता आणि 15 वर्षांची पेन्शन रद्द

close