मनसेच्या परीक्षेला 3,156 उमेदवार वर्गात !

December 3, 2011 4:37 PM0 commentsViews: 1

03 नोव्हेंबर

महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सगळ्याच पक्षांनी इच्छुक उमेदवारांचा आढावा घ्यायला सुरूवात केलीय. पण त्याहीपुढे जात मनसेने पक्षातल्या इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याची घोषणा केली. उद्या म्हणजेच रविवारी ही परीक्षा होत आहे. मनसेच्या परीक्षा पद्धतीवर जरी विरोधकांनी टीका केली असली तरी इच्छुकांनी मात्र या परीक्षा पद्धतीला चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबईत 227 जागांसाठी सर्वाधिक म्हणजे 1208 इच्छुक उमेदवार परिक्षेला बसले आहेत. त्या खालोखाल इच्छुक उमेदवारांची संख्या नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये 648 लोक परिक्षेला बसणार आहेत. तर ठाण्यात 397 जण परिक्षेला बसणार असून पुण्यात 611 इच्छुक उमेदवारांनी परिक्षेसाठी तयारी चालवलीय. पिंपरी चिंचवडमध्ये 188 आणि नागपूरमध्ये 104 इच्छुक अशा एकूण सहा महापालिकेत 3156 इच्छुक नगरसेवकपदासाठीच्या उमेदवारीसाठी परिक्षेला बसणार आहेत. 'मनसे' परीक्षा

मुंबई- 227 जागा, 1208 इच्छुक नाशिक – 648 ठाणे – 397 पुणे – 611 पिंपरी-चिंचवड – 188 नागपूर – 104एकूण सहा महापालिका- 3156 इच्छुक

close