गोंदियात नक्षलवाद्यांनी केली ग्रामपंचायतींच्या कार्यालयांची जाळपोळ

December 4, 2011 3:19 PM0 commentsViews: 4

04 डिसेंबर

गोंेदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांची पिपरखारी आणि मिसपीरी या ग्रामपंचायतींच्या कार्यालयांची जाळपोळ केली. या दोनही ग्रामपंचायती देवरी तालुक्यातील आहेत. सशस्त्र नक्षलवाद्यांनी मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास ही जाळपोळ केली. सध्या नक्षलवाद्यांचा काळा सप्ताह सुरु आहे. या पुर्वीही गडचिरोली जिल्हात दोन ग्रामपंचायत कार्यालयांची जाळपोळ करण्यात आलीय. याच भागात गुरुवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एक पोलीस जवान शहीद झाला होता. गोंदियाकडून गडचिरोलीला जाणारा रस्ताही नक्षलवाद्यांनी अडवला. रस्यावर ठिकठिकाणी झाडे कापून नक्षलवाद्यांनी हा रस्ता अडवला. माओवादी नेते किशनजींचा काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाच्या चकमकीत मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात नक्षलग्रस्त भागात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत.

close