बेकायदेशीर 32 टन कुजलेल्या मांसाची होणार तपासणी

December 4, 2011 4:27 PM0 commentsViews: 2

04 डिसेंबर

मुंबईतील देवनार डंम्पिंग ग्राऊंड मध्ये बेकायदेशीरपणे 32 टन कुजलेल्या मांसाची विल्हेवाट लावण्यात आल्याची बातमी आयबीएन लोकमतने कालच दाखवली होती. मुंबई महापालिकेनंही या प्रकरणी कारवाईचं आश्वसन दिलं होतं. आणि आज राज्य सरकारनेसुद्धा आमच्या या बातमीची दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून करण्याचे आदेश पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिले आहे. उद्यापर्यंत त्यांचा अहवाल येईल आणि त्यानंतर दोषी अधिकारी आणि कंपनी यांच्यावर तत्काळ कारवाई करु असं आश्वासनसुद्धा अहिर यांनी दिलं आहे. देवनार डंपिंग ग्राऊंडवर मांसाची विल्हेवाट लावण्याची म्हणजेच जैविक कचरा टाकण्याची परवानगी नाही. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तरीही परदेशातून आलेलं 32 टन कुजलेलं मांस देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात आलं आहे.

close