एका पर्वाचा अंत झाला – बिग बी

December 4, 2011 10:15 AM0 commentsViews: 5

04 डिसेंबर

एव्हरग्रीन लिजंडरी आणि भारतीय चित्रसृष्टीच्या राज-दिलीप-देव या गोल्डन त्रिकुटातला देव आनंद नावाचा तारा आज निखळला. सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या देव आनंद यांचं काल रात्री लंडनमध्ये हृदयविकारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. देवसाहेबांची निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया टिवट्‌रच्या माध्यमातून व्यक्त केल्या.अमिताभ बच्चन- एका पर्वाचा अंत झालाय. देवसाहेबांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झालीये ती कधीच भरुन काढू शकत नाहीमाधुरी दीक्षित – अजून एका आयकॉन स्टेज सोडून निघून गेला. ते कायम आठवणीत राहतील महेश भट- मी या स्टारला सलाम करतो ज्याने त्याच्या स्मित हास्याने आपल्या कायम मंत्रमुग्ध केलं

close