इंदू मिलमध्ये रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन

December 6, 2011 12:14 PM0 commentsViews: 9

6 डिसेंबर, मुंबई

इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला देण्यासाठी गेल्या काही तासांपासून रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते इथे ठिय्या आंदोलन केलं. हे कार्यकर्ते इंदू मिलची जागा ताब्यात घेण्यासाठी इथं घुसले. जागा ताब्यांत घेण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. जवळपास 800 कार्यकर्ते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी घुसले आणि त्यांनी तेथे आंदोलन केलं.

दरम्यान सकाळीच मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला मिळावी असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिल्याची माहिती दिली होती. लवकरच यावर निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. तसंच दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याचा प्रस्तावही केंद्राकडे पाठवला असल्याची माहिती त्यांनी दिली.

close