…तर लोकपालसाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवा – अण्णा हजारे

December 7, 2011 12:38 PM0 commentsViews: 1

07 डिसेंबर

लोकपाल विधेयकाच्या मंजुरीसाठी वेळ लागत असेल, तर गरज पडल्यास सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली. याच अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर करा असा आग्रहही अण्णांनी धरला. सरकारने मनात आणले तर हे विधेयक मंजूरही होऊ शकतं, असंही अण्णा म्हणाले. जर सरकारने हे केलं नाही, तर पाच राज्यात होणार्‍या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध प्रचार करणार असल्याची घोषणाही अण्णांनी केली.

पण लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी एवढा वेळ लागण्याची गरजच काय, असा सवालही अण्णांनी उपस्थित केला. कनिष्ठ नोकरशाही ही लोकपालाच्या कक्षेत यायलाच हवी, अशी प्रमुख मागणी अण्णांनी केली. काँग्रेसने जर कनिष्ठ नोकरशाहीला लोकपालाच्या कक्षेत आणलं नाही, तर काँग्रेसची भूमिका देशातल्या लोकांना सांगणार असल्याचंही अण्णा म्हणाले. लोकपालाच्या संदर्भात संसद जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असंही अण्णांनी स्पष्ट केलं. भ्रष्टाचार दूर करण्याचे सरकारच्या मनात नाही, असा आरोपही अण्णांनी केला.

close