इंदू मिलच्या जागेसाठी भिमसैनिक रस्त्यावर

December 7, 2011 9:34 AM0 commentsViews: 3

07 डिसेंबर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जागा देण्याचा निर्णय घ्यावा यासाठी रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्त गेल्या 27 तासांपासून ठिय्या आंदोलन करत आहे. अजूनही सरकारकडून त्यांना कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. जोपर्यंत सरकार ही जागा देत नाही तोपर्यंत मिलमध्येच राहण्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे. दरम्यान गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी इंदू मिलमध्ये रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले. चैत्यभूमीच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा निर्णय लवकर होत नसल्याने हे आंदोलन झालंय, त्यामुळे जागा लवकरच मिळावी असं मतही त्यांनी व्यक्त केलं. तर दुसरीकडे केंद्र सरकारने इंदू मिलची जागा द्यायला टाळाटाळ केल्याचा आरोप बुलडाण्यात भारिप बहुजन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा पुतळा बनवून निषेध व्यक्त केला. तर अकोल्यात भारीप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानाच्या प्रतिकात्मक पुतळा करून निषेध केला.

close