ओशिवारा हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत

November 19, 2008 12:53 PM0 commentsViews:

19 नोव्हेंबर, मुंबईमुंबईतल्या ओशिवरा भागातील अनमोल लॉण्ड्रीत अकरा नोव्हेंबरला दुहेरी खूनसत्र घडलं होत. या प्रकरणातील आरोपी शिवा याला मुंबई पोलिसांनी मिरतमधून अटक केली आहे. हत्या झाल्यानंतर लॉण्ड्रीत काम करणारा शिवा फरार होता, त्यामुळे मुंबई पोलिसांना त्याच्यावर संशय होता. आणि याच आधारावर मुंबई पोलिसांनी शिवाचा शोध घेतला.शिवाला काल रात्री उशीरा पोलिसांनी मेरठ वरून मुंबईत आणंलं. 11 नोव्हेंबरलाच मुंबईतल्या नालासोपार्‍यात एका दाम्पत्याची आणि त्यांच्या दोन मुलांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. तर वरळी आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स मध्येही मृतदेह सापडले होते.

close