‘लोकपाल’चा अहवाल स्वीकारला ; अण्णांच्या मागण्या फेटाळल्या

December 7, 2011 2:00 PM0 commentsViews: 3

07 डिसेंबर

लोकपालचा मुद्दाही आज दिवसभर राजधानी दिल्लीत गाजला. आज स्थायी समितीने लोकपाल विधेयकावरचा अहवाल स्वीकारला. आता 19 तारखेला या ऐतिहासिक विधेयकावर संसदेत चर्चा होणार आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या शेवटच्या अतिरिक्त बैठकीत काँग्रेसच्या तीन सदस्यांनी पुन्हा घूमजाव करत कनिष्ठ नोकरशाही लोकपालाच्या कक्षेत हवी, अशी मागणी केली. पण ती मागणी मंजूर न झाल्याने त्यांनी असहमतीची पत्रं दिली. इतर मागासवर्गीय जातींनी लोकपालात आरक्षण नसल्यामुळे लालू प्रसाद यांनीही असहमतीचं पत्र दिलं. यापूर्वीच भाजप सदस्यांनी असहमीचं पत्र दिलं होतं. त्यामुळे एकूण 16 सदस्यांनी आतापर्यंत या अहवालाला असहमती दाखवली. तरीही हा अहवाल समितीचं मत प्रतीत करतो, असा दावा अध्यक्ष अभिषेक मनुसिंघवींनी केला. हा अहवाल परवा म्हणजे 9 तारखेला संसदेत मांडला जाईल. 19 डिसेंबरपासून 22 डिसेंबरपर्यंत त्यावर चर्चा होईल.

लोकपाल: मतभेद कायम!1. कनिष्ठ नोकरशाही- स्थायी समिती : राज्य सरकारची कनिष्ठ नोकरशाही लोकायुक्तांच्या कक्षेत आणि केंद्र सरकारची CVC च्या कक्षेत- टीम अण्णा: कनिष्ठ नोकरशाही लोकपालाच्या कक्षेत; मागणी फेटाळली

2. न्यायपालिका- स्थायी समिती: तयार असलेले स्वतंत्र विधेयक पुरे- टीम अण्णा: तयार असलेले स्वतंत्र विधेयक सशक्त करण्याची गरज; मागणी फेटाळली

3. जनतेची सनद- स्थायी समिती: स्वतंत्र विधेयकला कॅबिनेटची मंजुरी- टीम अण्णा: स्वतंत्र कायदा नको, सनद लोकपाल कायद्यात हवी; मागणी अंशत: फेटाळली4. लोकायुक्त- स्थायी समिती: केंद्रीय कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमले जातील- टीम अण्णा: राज्याराज्यांत सशक्त लोकायुक्त हवे; मागणी अंशतः मान्य

5. पंतप्रधान- स्थायी समिती: पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत नको- टीम अण्णा: पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत हवे; मागणी फेटाळली

6. सीबीआय- स्थायी समिती: सीबीआय स्वतंत्र राहणार- टीम अण्णा: सीबीआयची भ्रष्टाचारविरोधी शाखा लोकपालमध्ये विलीन करा; मागणी फेटाळली

7. केंद्रीय दक्षता आयोग- स्थायी समिती: CVCचे अधिकार वाढवा- टीम अण्णा: CVCची भ्रष्टाचारविरोधी शाखा लोकपालमध्ये विलीन करा; मागणी फेटाळली

8. नेमणूक- स्थायी समिती: लोकपालांच्या नेमणुकीवर अंशतः सरकारी प्रभाव- टीम अण्णा: लोकपालाची नेमणूक पूर्णतः सरकारी प्रभावापासून दूर हवी; मागणी अशतः फेटाळली

close