टीम अण्णांविरुद्ध राजू परूळेकर मैदानात

December 7, 2011 10:03 AM0 commentsViews: 2

07 डिसेंबर

दिल्लीत 11 डिसेंबरला जंतमंतरवर अण्णा हजारे यांनी एक दिवसाचं उपोषण करण्याचं जाहीर केलं आहे. आता या टीम अण्णा विरूध्द राजू परूळेकरांची टीम उपोषण करणार आहे. टीम अण्णा आणि सरकार यांच्यात आतून संगनमत झाल्याचे सांगत राजू परूळेकरांनी हे आंदोलन जाहीर केलं. परूळेकरांसोबत शरद पवारांचे निकटवर्तीय अनिरूध्द देशपांडेही असल्याने परूळेकरांच्या मागे कुठला राजकीय पक्ष आहे का याची चर्चा सुरू झालीय. सध्या अण्णा आणि शरद पवारांमध्ये शाब्दिक युध्द सुरू असताना या घटनेला महत्वा प्राप्त झालं आहे. तर मी फक्त राजू परूळेकरांना भेटण्यासाठी आलोय असं स्पष्टीकरण अनिरूध्द देशपांडे यांनी दिले.

close