पुण्यातील कुख्यात गुंड महाकाली पोलीस चकमकीत ठार

December 7, 2011 8:17 AM0 commentsViews: 8

07 डिसेंबर

पुण्यातील कुख्यात गुंड राकेश ढकुलिया उर्फ महाकाली आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. देहुरोडमधल्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये ही घटना घडली. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. राकेश येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. पहिल्यांदा पोलिसांनी त्याला शरण येण्याचं आवाहन केलं. पण त्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केला. मग पोलिसांनी केलेल्या गोळीबारात राकेश ठार झाला. पोलिसांनी त्याच्याकडून दोन रिव्हॉलव्हर जप्त केल्या आहेत. राकेशवर खून, खूनाचे प्रयत्न असे गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांवर 4 वेळा हल्ल्यांचा प्रयत्नही त्याने केला आहे.

close