पंजाबमध्ये पोलिसांकडून शिक्षकांना मारहाण

December 7, 2011 5:48 PM0 commentsViews: 1

07 डिसेंबर

पंजाबमध्ये एका सरपंचाने एका शिक्षिकेला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता पोलिसांनीसुद्धा शिक्षिकांवर हात उगारला आहे. पंजाबमधल्या एका गावात दोनच दिवसांपूर्वी सरपंचाने शिक्षिकेला मारहाण केली होती. मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांची आज याच गावात रॅली होती. पण गावकरी आणि शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनीही आंदोलन करणार्‍या शिक्षकांवर पोलिसांना लाठीमार केला. यामुळे हे शिक्षक आक्रमक झालेत. याआधी, शिक्षिकेला मारहाण करणार्‍या आरोपी सरपंचाला कडक शिक्षा करा नाहीतर आत्मदहन करू, असा इशारा या आंदोलक शिक्षकांनी दिला.

close