पाकचे राष्ट्राध्यक्ष झरदारी हॉस्पिटलमध्ये दाखल

December 7, 2011 11:52 AM0 commentsViews: 2

07 डिसेंबर

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना दुबईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी झरदारी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना मेडिकल ऍम्ब्युलन्समधून दुबईत उपचारासाठी नेण्यात आलं आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानच्या मेमोगेट स्कँडलनंतर झरदारी आज पाकिस्तानच्या संसदेत स्पष्टीकरण देणार होते.

पण त्यांचं स्पष्टीकरण आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. मेमोगेट प्रकरणी झरदारी यांच्यावर पाकिस्तान लष्कराकडून टीका करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्यावर लष्कराकडून मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला होता. इतकचं नाही तर नेटोनं अफगाणिस्तान बॉर्डरवर केलेल्या हवाई हल्ल्यात 24 पाकिस्तानी नागरीक ठार झाले होते.

त्यामुळे पाकिस्तानचे नागरिक सरकारवर भडकले आहेत. आणि म्हणून पाकिस्तानने नेटो फोर्सेसचे सप्लाय रूट बंद केला आहे. यावरुन पाकिस्तानने अमेरिकेचाही रोष ओढावून घेतला. याप्रसंगी झरदारी आता दुबईला निघून गेल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. आणि झरदारी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देतील अशीही शक्यता वर्तवली जातेय.

close