आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक

December 8, 2011 10:02 AM0 commentsViews: 4

08 डिसेंबर

भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांना पोलिसांनी जमीन व्यवहार प्रकरणी अटक केली आहे. नगरचे डॉ. प्रकाश कांकरीया यांनी कर्डिले यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. एका जमीन व्यवहारात 92 लाखांनी फसवल्याचा आरोप कर्डिले यांच्यावर आहे. कर्डिले यांना अहमदनगर कोर्टात हजर करण्यात आलं आहे.

close