इंदू मिलसाठी रिपाईच्या कार्यकर्त्यांची मंत्रालयात निदर्शन

December 7, 2011 12:10 PM0 commentsViews: 1

07 डिसेंबर

इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयावरही धडक दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दालनासमोर त्यांनी निदर्शने केली. 6 व्या मजल्यावर निदर्शनं करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. इंदू मिलची जागा स्मारकाला मिळालीच पाहीजे आणि दादर स्टेशनला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नावा द्यावं यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

close