‎’डर्टी पिक्चर’चा पैसा वसूल

December 7, 2011 12:22 PM0 commentsViews: 11

सोमेन मिश्रा, मुंबई

07 डिसेंबर

गेला आठवडा गाजवला तो डर्टी पिक्चरनं… लोकांनीही डर्टी पिक्चरला चांगलीच पसंती दिली. डर्टी पिक्चरने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. आणि पहिल्याच आठवड्यात गल्ला जमवला आहे.हॉट ऍन्ड सेक्सी असं रुप विद्या बालनचं याआधी कधी पाहिलंच नव्हतं. द डर्टी पिक्चरचा युएसपी हाच तर होता. मिलन लुथरियाचं दिग्दर्शन. नसीरुद्दीन शहा, इम्रान हाश्मी, तुषार कपूर यांच्या भूमिका. एकता कपूरनं अगोदरच हा सिनेमा चर्चेत कसा राहील याची पुरेपूर काळजी घेतलेली. प्रोमोजचाही परिणाम झालाच आणि सिनेमाचे ओपनिंग मल्टिप्लेक्समध्ये 60 ते 65 % झालं. तर सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये 80 ते 85 टक्के..

सिनेमा बनला 21कोटींचा. शुक्रवारी सिनेमाने कमावले साडेनऊ कोटी..शनिवारी 10.7 कोटी आणि रविवारी 12.3कोटी..वीकेण्डचं एकूण उत्पन्न 32.7 कोटींचं झालं. सिनेमा ऍडल्ट आहे, म्हणजे फॅमिली ऑडियन्सची गर्दी सिनेमाला नव्हती. तर तरीही सिनेमाने चांगलं कलेक्शन केलं. आता लेडीज व्हर्सेस रिकी बहल रिलीज होतोय. बँड बाजा बारात सिनेमाचीच गँग लेडीज व्हर्सेस रिकी बहल सिनेमात भेटणार आहे. काऊंटडाऊन सुरू झालंय.

close