…तोपर्यंत मिलमध्येच राहण्याचा रिपाईच्या कार्यकर्त्यांचा निर्धार

December 8, 2011 10:21 AM0 commentsViews: 11

08 डिसेंबर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जागा देण्याचा निर्णय घ्यावा यासाठी रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्त गेल्या दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन करत आहे. अजूनही सरकारकडून त्यांना कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. जोपर्यंत सरकार ही जागा देत नाही तोपर्यंत मिलमध्येच राहण्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे. सहा डिसेंबरला आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी इंदू मिलवर हल्लाबोल केला होता. मिलमध्ये तथागत गौतम बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत मिलचा ताबा द्यावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

close