महागाईला केंद्र सरकार जबाबदार -सुषमा स्वराज

December 8, 2011 12:48 PM0 commentsViews: 6

08 डिसेंबर

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोनवेळा ठप्प झालं होतं. पण त्यानंतर महागाईवरील चर्चेला सुरूवात झाली. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी महागाईच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. महागाई वाढण्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप सुषमा स्वराज यांनी केला. नियोजन आयोगाच्या गरिबीच्या रेषेवरही सुषमा स्वराज यांनी आक्षेप घेतला.

32 रूपयात सर्वसामान्यांचे पोट कसं भरणार ? असा सवालही त्यांनी सरकारला विचारला. हॉवर्डमध्ये शिकलेल्यांना, भारतातल्या गावांचं अर्थशास्त्र काय कळणार असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. तर विदर्भात कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, गोंदिया, भंडार्‍यात धान उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. पण सरकारचे याकडे लक्ष नाही असा आरोपही त्यांनी केला. गिरीश महाजन यांना उपोषण करावे लागले तरी राज्य सरकार काहीचं करत नाही असा आरोपही सुषमा स्वराज यांनी लोकसभेत केला.

close