अखेर सुमननगर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

December 8, 2011 12:57 PM0 commentsViews: 6

08 डिसेंबर

मुंबईतल्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील रखडलेला सुमन नगर फ्लायओव्हर आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पण यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक चांगली पायंडा पाडला. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या फ्लायओव्हरचं उद्घाटन न करता हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला केला. हा फ्लायओव्हर मुंबईतला सगळ्या जास्त रखडलेला फ्लायओव्हर आहे.एमएमआरडीए (MMRDA) तर्फे बांधण्यात आलेला हा अकरावा फ्लायओव्हर आहे. ट्रॉम्बेमार्गे नवी मुंबईकडे जाणार्‍या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, पुण्याकडे जाणार्‍या लोकांसाठी हा फ्लायओव्हर उपयोगी ठरणार आहे.

close