वनहक्क परिषदेने दिली आदिवासींना हक्काची शेती

December 8, 2011 1:03 PM0 commentsViews: 10

08 डिसेंबर

राज्यभरात दारिद्र्यरेषेखालील 5 लाख आदिवासींची कुटुंब आहेत. रोजीरोटीसाठी हे आदिवासी वणवण भटकत असतात. त्यांना आपल्या गावातच उत्पन्न मिळावे यासाठी सरकारने त्यांना वनहक्क परिषदेच्या माध्यमातून अडीच एकर ते पाच एकरापर्यंत जमीन दिली. पण तरीही आदिवासींना या जमिनी कसता येत नव्हत्या. यासाठी राज्य सरकारने प्रायोगिक तत्वावरती आणि जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातील आदिवासींना त्यांच्या जमीनीचं सपाटीकरण त्याचबरोबर विहिर खोदून दिली . इलेक्ट्रानिक पंप बसवून दिले आणि बी – बियाणं देण्यात आलं. मोगरा आणि हळदीचे प्रायोगिक तत्वावरउत्पादन करायला लावलं. सरकारच्या या योजनेला उत्तम प्रतिसाद लाभल्याचं दिसून आलंय. यामुळे तालुक्यातल्या शेतकर्‍यांची पोटासाठी वणवण थांबली आहे.

अशी राबली योजना- या योजनेअंतर्गत तालुक्यातल्या 20 शेतकर्‍यांनी हळदीची लागवड केली- 800 आदिवासी शेतकर्‍यांनी मोगर्‍याची लागवड केली- याकरता अडीच लाख रुपयांपर्यंत सरकारनं मदत केली- मागील वर्षभरात या शेतकर्‍यांकडून 30 लाख रुपयांची मोगर्‍याची फुलं दादर मार्केटमध्ये विकली गेली. – एकरी सातशे मोगर्‍याची झाडे आदिवासींनी लावलीय.- तर एका एकरामध्ये 25 ते 30 क्विंटल सुकलेल्या हळदीचं उत्पादनही शेतकर्‍यांनी घेतलंय.- यातून दररोज 40 ते 50 किलो मोगर्‍याचं उत्पादन मिळतंय.

close