विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांचा मुंबईत मोर्चा

November 18, 2008 8:01 PM0 commentsViews: 3

17 नोव्हेंबर, मुंबईमहापालिकेत काम करणार्‍या सफाई कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे,या मागणीसाठी श्रमजीवी कामगार संघटनेनं मीरा-भाईंदर महापालिकेवर मोर्चा नेला. या कामगारांना प्रॉव्हिडंट फंड मिळाला पाहिजे, हीसुद्धा या कामगारांची मागणी आहे. कामगार आयुक्तांच्या प्रतिनिधींशी श्रमजिवी संघटनेचे विवेक पंडित यांनी चर्चा केली. मुंबईप्रमाणेच इतर महापालिकांच्या कामगारांची परिस्थिती आणखी हलाखीची आहे, असंही त्यांनी सांगितलं. कामगार कायद्यानुसार सर्व सफाई कामगारांना पर्मनन्ट करावं, अशी मागणीही त्यांनी केली.

close