निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नांदेडमध्ये सापडले 5 लाख रुपये

December 8, 2011 2:24 PM0 commentsViews: 7

08 डिसेंबर

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांच्याच मतदारसंघ असलेल्या अर्धापूरमध्ये एका इंडिका कार मध्ये मतदारांना वाटण्यासाठी पाच लाख रोकड सापडली आहे. या गाडीमध्ये कोणत्या कार्यकर्त्यांना किती पैसे द्यायची यादी आणि पैशाची पाकिटं तयार होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिस दाद देत नव्हते. शेवटी शिवसेनचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी गाडीतील रोकड बाहेर काढली. परिसरातील नागरिकांना याची माहिती पाटील यांनी दिली. शिवसैनिक आणि पोलिस झटापटही झाली. संतप्त शिवसैनिकांनी दगडफेकही केली शेवटी पोलिसांनी दोन व्यक्तींना गाडी आणि रोकडसह हजर केली. हे दोन कार्यकर्ते काँग्रेसचेच असल्याचे स्पष्ट झाले. या झालेल्या प्रकारावर काँग्रसच्या नेत्यांनी हे पैसे वाटण्यासाठी आणले नव्हते आणि या पैशांचा कुठलाही संबध काँग्रेस पक्षाशी नाही असा निर्वाळा दिला.

close