इंदू मिलच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

December 9, 2011 5:42 PM0 commentsViews: 3

09 डिसेंबर

इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी 6 डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली इंदू मिलचा रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्त्यांनी ताबा घेतला. आज चौथ्या दिवशीही भीमसैनिक मिलचा ताबा सोडण्यास तयार नाही. आता अखेर सरकारने ही जागा स्मारकासाठी तातडीनं उपलब्ध करुन देण्यासाठी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. इंदू मिलची जागा तातडीने राज्याला देण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना केली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन ही मागणी केली.

close