डोपिंग प्रकरणी 8 ऍथलिट्सना क्लिन चीट

December 9, 2011 11:34 AM0 commentsViews:

09 डिसेंबर

गेल्या जुलै महिन्या, भारताचे आठ ऍथलिट्स डोपिंग प्रकरणी दोषी आढळले होते. पण या प्रकरणाची चौकशी करणार्‍या एक सदस्यीय समितीने या ऍथलिट्सना क्लिन चिट दिली आहे. ऍथलिट्सकडून घेण्यात आलेलं प्रतिबंधीत द्रव्य हा एक अपघात होता. ते जाणीवपूर्वक घेतल गेलं नाही असं मत अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या संपूर्ण वादाची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने एक सदस्यीय समिती नेमली होती. हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधिश मुकुल मुदगल हे समितीचे प्रमुख आहेत. डोपिंग प्रकरणी मनदीप कौर, अश्विनी आखुंजी, सिनी जोन्स, प्रियंका पनवर, जुआना मुरमू, तियाना मेरी, आणि सोनिया या आठ ऍथलिट्सना निलंबित करण्यात आलंं होतं. तसेच कोच युरी ओगोरोड्निक यांनाही पदावरून हटवण्यात आलं. पण आता क्लिन चीट मिळाल्यानं हे खेळाडू लंडंन ऑलिम्पिकसाठी उपलब्ध होण्याची शक्यताही वाढली आहे.

close