डबेवाले उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात

December 8, 2011 5:40 PM0 commentsViews: 2

08 डिसेंबर

मुंबईची शान असलेला डबेवाला आता महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे. आज डबेवाल संघटनेचे रघुनाथ मेदगे आणि गंगाराम तळेकर यांच्याबरोबर डबेवाल्यांचे 10 जणांचे शिष्टमंडळ आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना भेटले. येत्या महापालिका निवडणुकीत डबेवाल्यांना योग्य ते प्रतिनिधित्व द्यावं अशी विनंती त्यांनी उद्धव ठाकरेंना केली. त्याचबरोबर इतर पक्षांकडूनही उमेदवारी मागणार असल्याचे डबेवाल्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं. त्यासाठी प्रत्येक पक्षानी किमान एक तरी जागा द्यावी अशी मागणी डबेवाले करणार आहोत.

close