आक्रमक राजकीय प्रचारावर सरन्यायाधीश नाराज

November 19, 2008 1:20 PM0 commentsViews: 4

19 नोव्हेंबर दिल्लीसमाजात दरी निर्माण होईल अशा विषयांवर राजकारणी करत असल्याच्या आक्रमक प्रचारावर भारताचे सरन्यायाधीश के.जी. बालकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिल्लीत एका समारंभादरम्यान ते बोलत होते. असे भेदाभेद भारतीय राज्यघटनेला मारक असल्याचंही बालकृष्णन यांनी म्हटलं. 'जात, वर्ग आणि प्रांतवादासारखे भेद या हिंसेला कारणीभूत आहे. विशेषत: गेल्या काही महिन्यातले प्रकार तर अमानुष हिंसेचे होते, असं ते म्हणाले.'

close