बॉम्बस्फोटात निर्दोष मुक्त झालेल्यांना मिळाली 70 लाखांची भरपाई

December 8, 2011 6:07 PM0 commentsViews: 6

08 डिसेंबर

आंध्र प्रदेश सरकारने आज बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्यांना एकूण 70 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावा असा ऐतिहासिक आदेश दिला आहे. हैदराबादमध्ये 2007 साली मक्का मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणी 50 तरुणांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आलं होतं. त्यांना आंध्र प्रदेश सरकारने प्रत्येकी 20 हजार रुपयांची मदत केलीय. तर गुन्हे दाखल झालेल्या 20 जणांना तपासानंतर निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. त्यांना प्रत्येकी 3 लाख रुपये मिळतील. बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सरकारकडे काही शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार आणि विश्वासदृढतेसाठी आंध्र प्रदेश सरकारनं हे पाऊल उचललं आहे.

close