कोल्हापुरात जातपडताळणी कार्यालयात शिवसैनिकांचा राडा

December 9, 2011 3:56 PM0 commentsViews: 8

09 डिसेंबर

कोल्हापूर विभागीय जातपडताळणी कार्यालयामधल्या भोंगळ कारभाराविरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन केलं. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी कार्यालयामध्ये घुसून अधिकार्‍यांना धारेवर धरलं. त्याचबरोबर कार्यालयामधल्या एका अधिकार्‍याला धक्काबुक्की केली. कार्यालयामधल्या काही साहित्याचंही नुकसान झालं. वारंवार खेटे मारुनही विद्यार्थी, नोकरदार व्यक्तींनाही जातपडताळणीचा दाखला वेळेत मिळत नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी हे आंदोलन केलंय. यापुढे जातपडताळणी कार्यालयामध्ये विद्यार्थी किंवा नोकरादारांना वेळेत दाखले मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करु असा इशारा यावेळी देण्यात आला.

close