अभियंत्याला मारहाण, 3 मनसे नगरसेवकांवर गुन्हे दाखल

December 9, 2011 4:27 PM0 commentsViews: 1

09 डिसेंबर

अंबरनाथ मधील काही भागाला गेल्या अनेक महिन्यापासून नियमित पाणी पुरवठा होत नाही. चिखलोली धरणातून या भागाला पाणी पुरवठा होतोय. पण पाच तासाचे भारनियमन असल्याने धरणावर जनरेटर बसवण्यात आलं आहे. धरणावरच्या जनरेटरला डिझेल पुरवठा करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे विद्युत अभियंता किशोर देशपांडे यांच्याकडून डिझेल पुरवठा करण्यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली गेली नाही. आणि संबधीत कुठल्याही विभागाला साधा पत्रव्यवहारही केला नाही असा आरोप नागरिक करत आहे. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अभियंत्याला मारहाण केली. या प्रकरणात मनसेच्या तीन नगरसेवकांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close