बलिदानासाठी तयार रहा – अण्णा

December 10, 2011 10:11 AM0 commentsViews: 1

10 डिसेंबर

लोकपाल विधेयकाच्या तिसर्‍या लढाईसाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. स्थायी समितीने लोकपाल विधेयकाचा दिलेला अहवाल हा जनतेचा विश्वासघात आहे अशी घणाघाती टीका काल शुक्रवारी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केली होती. आज अण्णा दिल्लीसाठी रवाना झाले आहे.औक्षण करुन राळेगणवासियांनी अण्णांना आंदोलनासाठी शुभेच्छा दिल्या. बलिदानासाठी तयार रहा असं आवाहन यावेळी अण्णांनी जनतेला केलं. अण्णा उद्या दिल्लीत एक दिवसीय उपोषण करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

close