सदाबहार देव आनंद यांच्यावर आज लंडनमध्ये अंत्यसंस्कार

December 10, 2011 9:22 AM0 commentsViews: 2

11 डिसेंबर

एव्हरग्रीन लिजंडरी आणि भारतीय चित्रसृष्टीच्या एका पिढीचे फॅशन आयकॉन बनलेल्या अभिनेते देव आनंद यांच्यावर आज लंडनमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या देव आनंद यांचे 3 डिसेंबरला रात्री लंडनमध्ये हृदयविकाराने निधन झालं होतं. ते 88 वर्षांचे होते. मेडिकल चेकअपसाठीच ते लंडनला गेले होते. पण तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता. वयाचं कुठलंही बंधन न पाळणारे देव साहेब सदा एक चिरतरूण व्यक्तिमत्त्व होतं.अनेक संगीतप्रधान सिनेमांतल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. आज संध्याकाळी त्यांच्यावर लंडनमध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत.

close