कमकुवत लोकपाल मागे राहुल गांधी – अण्णा

December 10, 2011 12:22 PM0 commentsViews: 4

10 डिसेंबर

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लेखी पत्र देऊन सुध्दा स्थायी समितीने पंतप्रधानांच्या पत्राला केराची टोपली दाखवत अहवाल सादर केला. हा अहवाल म्हणजे जनतेची फसवणूक आहे. त्याचबरोबर स्थायी समितीच्या कृत्यामागे राहुल गांधी असल्याचा आरोपही अण्णांनी केला. उद्या जंतरमंतरवर होणारं आंदोलन हे स्थायी समितीच्या अहवालाचा निषेध करण्यासाठी असल्याची घोषणा आज अण्णांनी केली.

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी तिसर्‍या लढाईसाठी आज दिल्ली गाठली. उद्या अण्णा एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार आहे. मागील दोन आंदोलनाच्या वेळी सरकारने अण्णांच्या मागण्या मान्यकरत अण्णांना उपोषण सोडण्यास भाग पाडले. मात्र अण्णांना दिलेले आश्वासन स्थायी समितीने धुडकावून लावले. यामुळे अण्णांनी 27 डिसेंबरपासून बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उद्या होणार्‍या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अण्णा आज दिल्लीत दाखल झाले. टीम अण्णांच्या सदस्यांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर जोरदार टीका केली.

सरकारचे लोकपाल बिल हे खाली टिनचा डबा आहे अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली तसेच तर स्थायी समितीच्या या अहवालाला स्थायी समितीच्या 30 पैकी फक्त 11लोकांची मंजुरी आहे. त्यामुळे हा स्थायी समितीचा रिपोर्ट आहे असं आपण मानतच नाही असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. तर मेध्याताई पाटकर यांनी या सरकारला धडा शिकवण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत व्यक्त केलं. तर भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे अधिकार लोकपालला असणार नाहीत. अशा प्रकारचं लोकपाल विधेयक आणून सरकारनं जनतेला मुर्ख बनवल्याचा आरोप टीम अण्णांचे सदस्य शांती भूषण यांनी केला.

अण्णा हजारे यांनी सरकारवर टीका करत पंतप्रधानांनी मागील उपोषण सोडते समयी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या मात्र स्थायी समिती त्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. हे सरकार आहे की किराणाचे दुकान ? अशी टीका अण्णांनी केली. तसेच स्थायी समितीच्या मागे राहुल गांधी याचा हात आहे असा आरोपही अण्णांनी केला. सरकारला सक्षम लोकपाल आणण्याची इच्छाशक्ती राहिली नाही ही लोकशाही आहे की हुकूमशाही ? या सरकारला जनता एक दिवस धडा शिकवेल असा इशाराही अण्णांनी दिला. उद्याचे आंदोलन हे स्थायी समितीच्या निषेध करण्यासाठी आहे. जर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सरकारने काही पाऊल उचली नाही. तर येत्या 27 डिसेंबरला बेमुदत आंदोलन करणार आहोत यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे असं आवाहनही अण्णांनी जनतेला केलंय.

close