राष्ट्रवादीच्या उमेदवाराची ‘देशी’च्या पेट्यासह गाडी जप्त

December 10, 2011 1:05 PM0 commentsViews: 7

10 डिसेंबर

नगरपरिषदेचं मतदान एक दिवसावर येवून ठेपली आहे. त्यातच दारु आणि पैसेवाटपाच्या घटना समोर येत आहे. वर्ध्यात पुलगावमध्ये दारु वाहतूक करतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची गाडी पोलिसांनी जप्त केली. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना दारु वाटण्यासाठी ही गाडी निघाली होती. पोलिसांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माया टाके यांचे पती सागर टाके यांच्यासह चार जणांना अटक केली. जप्त केलेल्या गाडीतून देशी दारुच्या दहा पेट्याही पोलिसांनी जप्त केल्या आहे. महत्वाचे म्हणजे ही गाडी राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल काळे यांच्या मालकीची आहे.

close