शिक्षक अधिवेशनावर, शाळा वार्‍यावर

December 10, 2011 1:09 PM0 commentsViews: 3

10 डिसेंबर

राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांचं 13 वं अधिवेशन रत्नागिरीत भरलं आहे. शिक्षण परिषेदेच्या या एक दिवसाच्या अधिवेशनात राज्यभरातले 30 हजाराहून जास्त प्राथमिक शिक्षक सहभागी झाले आहेत. या अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होतं. मात्र अधिवेशनाला शरद पवार हजर राहू शकले नाहीत. तरी आमदार सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, रत्नागिरीचे पालक मंत्री भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी हजेरी लावली. मात्र या राज्यस्तरीय अधिवेशनाला झाडून सगळया शिक्षकांनी हजेरी लावली. त्यामुळे मावळ मधल्या शाळा ओस पडल्या आहे. मावळ तालुक्यातल्या कार्ला, शिलाटणे, राऊतवाडी, करंज, येळते या गावांमधल्या प्राथमिक शाळांमध्ये अक्षरश: शुकशुकाट होता. आधीच विद्यार्थ्यांचा निरूत्साह आणि त्यातच शिक्षकांचे अधिवेशन त्यामुळे मुलांना शाळेला दांडी मारण्यावाचून पर्यायच उरला नाही. या निमित्ताने शिक्षक अधिवेशनावर आणि मुलं वार्‍यांवर अशीच परिस्थिती राज्यातल्या अनेक शाळांमध्ये दिसून आली.

close