किरीट सोमैय्यांचा हायटेक प्रचार

November 19, 2008 8:39 AM0 commentsViews: 3

19 नोव्हेंबर, मुंबईउदय जाधवमहाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी त्या आता काही लांब राहिलेल्या नाहीत. हे ओळखूनच भाजपच्या किरीट सोमय्या यांनी आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे आणि तो देखील हायटेक निवडणूक प्रचार. लहानपणापासूनच मुलुंडला राहणार्‍या प्रकाश शिंदे यांनी बर्‍याच निवडणुका आणि त्यांचे प्रचार पाहिले आहेत. पण यावर्षी त्यांच्या घरी निवडणूक आयोगाच्या अगोदरच त्यांची मतदार यादी आली आहे. ' बर्‍याचदा घरातल्या कोणा ना कोणाची नावं मतदार यादीतून वगळली जातात. मात्र आता प्रत्येकाचं नाव आणि स्लीप नंबर आधीच मिळाल्यामुळे आम्हाला आता मतदान करता येईल, याची खात्री आहे.' असं प्रकाश शिंदे यांनी सांगितलं.घरातल्या सर्व मतदारांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देण्यासाठी, भाजपच्या किरीट सोमय्या यांनी या हायटेक तंत्राचा वापर केलाय. त्यासाठी त्यांनी मतदार संघातल्या, प्रत्येक मतदारांच्या घरी अशा याद्या पाठवल्या आहेत. 'जर कोणाचं नाव चुकीच्या यादीत गेलं असेल, तरी आता या याद्यांमुळे आम्ही नागरिकांना जवळच्या केंद्रावर मतदान करण्याचा हक्क देत आहोत. यामुळे मतदानात पाच टक्के वाढ होईल, अशी आम्हाला आशा आहे ' असं किरीट सोमैय्या यांनी सांगितलं.निवडणुका होतील निकालही लागतील. आणि जर या हाय टेक प्रचारानं त्या जिंकता आल्याच, तर राज्यकर्ते जशी वोट बँकेची काळजी घेतात. तशी त्यांनी जनतेच्या विकास कामांची काळजी घ्यावी अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.

close