अजित वाडेकरांचा नायडू पुरस्काराने सन्मान

December 10, 2011 4:49 PM0 commentsViews: 7

10 डिसेंबर

बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आज चेन्नईत पार पडला. भारताचे आजी-माजी क्रिकेटपटू या सोहळ्याला हजर होते. या सोहळ्यात प्रतिष्ठेचा सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार भारताचे माजी कॅप्टन अजित वाडेकर यांना प्रदान करण्यात आला. भारतीय क्रिकेटमधल्या अतुलनीय योगदासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गौरव चिन्ह आणि रोख 15 लाख रुपये असे या पुरस्काराचं स्वरुप आहे.

वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने वेस्ट इंडिज व इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. याशिवाय 2010-11 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला. द वॉल राहुल द्रविडला सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूसाठी दिल्या जाणार्‍या पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. द्रविड सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असल्याने त्याच्या आई-वडिलांनी हा पुरस्कार स्विकारला. तर भारतीय बॉलर्स ईशांत शर्मा आणि आर अश्विनचा दिलीप सरदेसाई पुरस्काराने गौरव करण्यात आला.

close