सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

December 11, 2011 2:46 PM0 commentsViews: 1

11 डिसेंबर

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आहे. या अधिवेशनात कापूस प्रश्नी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे आजवरचे सर्वात कमजोर मुख्यमंत्री असल्याची परखड टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. भाजप, शिवसेनेसह विरोधी बाकावरच्या सर्वच पक्षांनी आज नागपूरमध्ये बैठक घेतली आणि दरवर्षीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. दरम्यान, कापूस, सोयाबिन, धान उत्पादक शेतकर्‍यांना सरकार मदत करेल, पण प्रति क्विंटल मदत देणं शक्य नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा म्हटलंय.

close