नगरपालिका निवडणुकीत सरासरी 65 टक्के मतदान

December 11, 2011 2:52 PM0 commentsViews: 2

11 डिसेंबर

राज्यातल्या 168 नगरपालिकांसाठी आज मतदान झालं. बहुतांश ठिकाणी शांतेतत मतदान झालं आणि वेंगुर्ला वगळता इतर सर्व ठिकाणी राज्यात सगळीकडे चांगले मतदान झालं आहे. आज झालेल्या निवडणुकीत सरासरी 60 ते 65 टक्क्यांवर मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली, असं राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले. आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. यावेळी मतदारांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखवला. दुपारी थोडी गर्दी कमी झाली. मात्र त्यानंतर मतदारांनी जोरदार उत्साह दाखवत मतदानाची टक्केवारी थेट 60 टक्क्यांच्या पुढे नेऊन ठेवली.

close