अण्णांना पाठिंबा : राळेगणमध्ये बंदची हाक

December 11, 2011 6:00 AM0 commentsViews:

11 डिसेंबर

अण्णा हजारे यांच्या एक दिवशीय आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणमध्येही आज धरणं आंदोलन आणि उपोषण होतं आहे. आज राळेगण गावबंद ची हाक दिली आहे. अण्णांच्या आंदोलनाला घरचा पाठिंबा देणारे सर्व गावकरी आंदोलनात उतरले आहे. आज सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून 'भ्रष्टाचार हटवा देश वाचवा' चा नारा दिला. अण्णांसोबत ग्रामसभा झाली होती तेव्हा ग्रामस्थांनी उपोषणात सहभागी होणाच्या आणि बंदचा निर्णय घेतला होता. अण्णांनी देशाच्या विकासासाठी लोकपालचा लढा उभारला आहे. सरकारने दखल घेऊन लोकपाल पास करावे अशी मागणी राळेगणवासी करत आहे. यासाठी यादवबाबा मंदिरात राळेगणवासी उपोषणाला बसला आहे.

close