इंदापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

December 12, 2011 9:08 AM0 commentsViews: 2

12 डिसेंबर

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा इंदापूर नगरपालिका ताब्यात ठेवण्यात यश मिळविलं असलं तरी त्यांचा हा आनंद कितपत टिकेल हा प्रश्न आहे.गेल्या 15 वर्षांपासून हर्षवर्धन पाटील यांचं नेतृत्व जरी असलं तरी यंदा काँग्रेसला सत्ता राखण्यात राष्ट्रवादीने बरीच दमछाक करायला लावली.अखेर अवघी 1 जागा जास्त मिळवून काँग्रेसनं बहुमत मिळविलं. पण काँग्रेसच्यानिवडून आलेल्या 9 पैकी 2 उमेदवारांविरुध्द निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल आहे. एकास तिसरं अपत्य तर दुस-याच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल आहे. चौकशीनंतर या तक्रारीत तथ्य सापडलं तर काँग्रेसच्या हातातून सत्ता निसटू शकते असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

close