पुण्यात नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व

December 12, 2011 9:11 AM0 commentsViews: 2

12 डिसेंबर

नुकत्याच झालेल्या खडकवासला विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला असला तरी नगरपालिका निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचंच वर्चस्व दिसून येतं आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाला अपवाद आहे तो जुन्नरचा जुन्नर नगर पालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादीला हादरा बसला आहे. इतिहासातून पहिल्यादांच सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे आल्या आहे. 17 जागांपैकी शिवसेनेला 9 जागा मिळाल्यात, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवारं 6 जांगावर विजयी झाले आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खात उघडत दोन जागा मिळवल्या आहे.

तसेच तळेगावमध्ये आमदार बाळा भेगडे यांच्या वर्चस्वाला हादरा बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23 पैकी 15 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला केवळ 8 जागेवर विजय मिळाला आहे. गेल्या नगरपरिषदेत भाजपची सत्ता होती. आता भाजपची सत्ता गेली आणि राष्ट्रवादीचीची आली आहेत.

close