वर्ध्यात निकालाविरोधात मतदार उतरले रस्त्यावर

December 12, 2011 10:40 AM0 commentsViews: 6

12 डिसेंबर

वर्धा जिल्हात पुलगावमध्ये जनता रस्त्यावर उतरलेली आहे. मतमोजणीत करताना गैरप्रकार झाल्याचा आरोप नागरिक करत आहे. या जमावाने बसेसवर दगडफेक केली तर शहरातली सगळी दुकानंही बंद आहे. या आक्रमक झालेल्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. शहरात आता दंगलनियंत्रण पथक दाखल झालेला आहे. प्रभाग दोनमधील 4 विजयी उमेदवारांवरुन गदारोळ झाला आहे. या उमेदवारांना आम्ही मतदानच केलेलं नसताना हे उमेदवार निवडूनच कसे आले असा सवाल नागरिक करत आहे.

close