राष्ट्रवादीचा 47 नगरपालिकांवर झेंडा ; शरद पवारांना वाढदिवसाची भेट

December 12, 2011 4:21 PM0 commentsViews: 13

12 डिसेंबर

राज्यातल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने सरशी घेतली आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या धामधुमीतच या निवडणुका पार पडल्या. अण्णांचे आंदोलन पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय होणार, असा प्रश्न पडला होता. पण स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत मतदारांनी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूनंच कौल दिला. या निवडणुकांमध्ये राष्ट्रावादीने सर्वाधिक नगरपालिका काबीज करत पक्षाध्यक्ष शरद पवारांना वाढदिवसाची भेट दिली.

168 नगरपालिकांपैकी 47 जागांवर राष्ट्रवादीने निविर्वाद सत्ता मिळवली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राष्ट्रावादीने आघाडी घेतली. तिथं राष्ट्रवादी सत्तेत आली. कराडमध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच धक्का दिला. बारामतीत अजित पवारांनी सत्ता राखत, शेजारीच असलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली. कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी सदाशिव मंडलिकांना धोबीपछाड दिली. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये दीडशे वर्षात पहिल्यांदाच सत्तांतर झालंय. तर पुण्यात तळेगावमध्ये धक्कादायक निकाल लागला. इथं सत्ताधारी भाजपला बाजूला सारत मतदारांनी राष्ट्रवादीच्या बाजूनं कौल दिला.

जुन्नरची सत्ता मात्र शिवसेनेनं राष्ट्रवादीकडून काबीज केली. मराठवाड्यातही राष्ट्रवादीचा करिष्मा पाह्याला मिळाला. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना फटका बसला. परळीमध्ये भाजपची प्रतिष्ठा वाचली. तर बीड पुन्हा राष्ट्रवादीने खेचून आणलंय. तर विदर्भात सत्तेत फारसा बदल होताना दिसला नाही. मनसेने कोकणात खेड येथे आणि यवतमाळमध्ये वणी इथं मनसेनं सत्ता खेचली आहे. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने प्राबल्य राखलंय. तर काही ठिकाणी नगरपालिका त्रिशंकू अवस्थेत आहेत. मावळ गोळीबाराचे राजकारण करणार्‍या भाजपला मात्र तळेगावमध्ये फटका बसला. तिथं राष्ट्रवादी सत्तेत आली.

नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झालीय, तर काँग्रेसनंही तुलनेनं चांगलं यश मिळवलंय. पण कोकणात मात्र सिंधुदुर्गात राणेंना जबर धक्का बसला आहे. राणेंच्या विरुद्धच्या महायुतीला मतदान करत मतदारांनी राणेंच्या दादागिरीला आपली ताकद दाखवून दिली. तर रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीतला कलह चव्हाट्यावर आला. खुद्द रत्नागिरीत राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत यांच्या वर्चस्वाला धक्का बसला. तर चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या आघाडीची बिघाडी झाली. शिवाय खेडमध्ये शिवसेनेला धक्का देत मनसेनं सत्ता खेचली.

पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकमेकांना शह दिला. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये दीडशे वर्षात पहिल्यांदाच सत्तांतर झालंय. जुन्नरची सत्ता शिवसेनेनं राष्ट्रवादीकडून काबीज केली आहे, कराडमध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांनाच धक्का दिला, तर म्हसवडमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली. तर बारामतीत अजित पवारांनी सत्ता राखत, शेजारीच असलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली. तिकडे कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी सदाशिव मंडलिकांना धोबीपछाड दिली.

सोलापूर जिल्ह्यात मात्र शरद पवारांच्याच मतदारसंघात राष्ट्रवादीला आपली सत्ता राखता आली नाही. माढ्यामध्ये गणेश कुलकर्णी हत्याप्रकरणाचे परिणाम राष्ट्रवादीला भोगावे लागले. तर पंढरपूरमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून असलेली सुधाकर परिचारक यांची सत्ता अपक्ष आमदार भारत भालकेंनी घालवली.

मराठवाड्यातही राष्ट्रवादीचा करिष्मा पाह्यला मिळाला. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना फटका बसला. तिकडे परळीमध्ये भाजपची प्रतिष्ठा वाचली. तर बीड पुन्हा राष्ट्रवादीने खेचून आणलं आहे. तर विदर्भात सत्तेत फारसा बदल होताना दिसला नाही. यवतमाळमध्ये वणी इथं मनसेनं सत्ता खेचली. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने प्राबल्य राखलं आहे. तर काही ठिकाणी नगरपालिका त्रिशंकू अवस्थेत आहेत. एकूणच आजच्या निवडणूक निकालांवर वर्चस्व राखत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाची भेटच दिलीय असं म्हणावं लागेल.

133 जागांचे बलाबल…

राष्ट्रवादी – 47काँग्रेस – 32काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी – 7भाजप – 8शिवसेना-3मनसे-2स्थानिक आघाड्या आणि इतर – 28

close