शरद पवारांच्या मतदारसंघातच राष्ट्रवादीला धक्का

December 12, 2011 5:06 PM0 commentsViews: 6

12 डिसेंबर

आजच्या नगरपालिका निकालात राष्ट्रवादीने 47 पालिकांवर आपला झेंडा रोवला जरी असेल मात्र सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांच्याच मतदारसंघात राष्ट्रवादीला आपली सत्ता राखता आली नाही. माढ्यामध्ये गणेश कुलकर्णी हत्याप्रकरणाचे परिणाम राष्ट्रवादीला भोगावे लागले. तर पंढरपूरमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून असलेली सुधाकर परिचारक यांची सत्ता अपक्ष आमदार भारत भालकेंनी घालवली. तसेच जुन्नर नगर पालिकेतही धक्कादायक निकाल लागला. इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हादरा बसला. इतिहासात पहिल्यादांच सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे गेल्या आहे. 17 जागांपैकी शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवारं 6 जांगावर विजयी झाले आहे.

राष्ट्रवादीला धक्का

* कृषीमंत्र्यांच्या लोकसभा मतदारसंघातच राष्ट्रवादीला जबर धक्का* पंढरपूरमध्ये सुधाकर परिचारकांची सत्ता अपक्ष आमदारानं उलथवली* कुर्डूवाडीत महायुतीनं उडवला राष्ट्रवादीचा धुव्वा, गणेश कुलकणीर्ंच्या हत्या प्रकरणाचा फटका* करमाळ्यातही राष्ट्रवादीला फटका, स्थानिक आघाडीची सरशी * मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला काटावर यश, भालके गटाची मुसंडी* सांगोल्यात महाआघाडीचं वर्चस्व* बार्शीत दिलीप सोपलांनी गड राखला* लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत, विजयसिंह मोहितेंकडून ढोबळेंकडे सोलापूरचं नेतृत्व गेल्यानंतर राष्ट्रवादीला फारसा फायदा होत नसल्याचं स्पष्ट झालंय.

close