‘घाशीराम कोतवाल’ 40 व्या वर्षात पदार्पण

December 13, 2011 12:14 PM0 commentsViews: 80

13 डिसेंबर

पुण्यातल्या शनिवारवाड्यावर आज पुन्हा एकदा पेशवाई अवतरली होती. निमित्त होतं नाट्यसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाने 40 व्या वर्षात पदार्पण केल्याचं…विजय तेंडुलकरांनी लिहीलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला प्रयोग 16 डिसेंबर 1972 ला राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाला होता. त्याला 40 वर्ष होत आहे. आणि याच निमित्ताने शनिवारवाड्यावर एक फोटोशूट झालं. नाटकातले सगळे कलाकार यावेळी पारंपारिक वेशभूषेत आले होते. 16 ते 20 डिसेंबर दरम्यान मुंबईमध्ये याचनिमित्ताने खास महोत्सव होणार असल्याचे माधव अभ्यंकर यांनी सांगितले.

close